मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

दिव, दमण, सिल्व्हासा ही नावं आपण लहानपणीच भूगोलाच्या पुस्तकात वाचली आहेत. तरी देखील ती ठिकाणं केंद्रशासित प्रदेश असल्याने त्यांच्याविषयी आपल्याला कुतूहल नेहमीच असतं. 
आज आपण दमण मधील निसर्ग सौंदर्य पाहूया. संजाण पासून दमण केवळ 24 किमी अंतरावर आहे. येताना वाटेत नारगोळचा सुंदर समुद्र किनारा आहे. परंतु दमण ला येण्याचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवेवरून वापी याठिकाणावरून दमणला जाता येते. दमण चे दोन भाग पडतात एक म्हणजे मोटी दमण आणि दुसरा नानी दमण. दमणला जामपोर समुद्र किनारा आहे. किनाऱ्यावर असलेल्या झाडीमुळे किनाऱ्याचे सौंदर्य खुलून दिसते. इथून सूर्यास्ताचे सिनेमॅटिक फोटो खूपच सुंदर निघतात म्हणून बरेच फोटोग्राफर सूर्यास्त कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी इथं येतात. मोटी दमणला एक किल्ला आहे त्याचे नाव फोर्ट ऑफ मोटी दमण असं आहे. दमणवर पोर्तुगीजांची सत्ता होती त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामावर पोर्तुगीज शैलीची छाप आढळते.
नानी दमणला देखील सेंट जोरेम फोर्ट आहे. तसेच इथला देवका हा समुद्र किनारा प्रसिद्ध आहे पण खडकाळ असल्याने पोहण्यासाठी योग्य नाही. पण अनेक चर्चेस, रेस्टॉरंट, लाईटहाऊस ही पाहण्यायोग्य ठिकाणे आहेत.
इथलं सत्यसागर उद्यान देखील सुंदर आहे. इथं गोव्यासारखं सौंदर्य बघायला मिळते पण ते गोव्यासारखं वर्दळीचा भाग बनलेला नाही तर अजूनही हे निसर्ग सौंदर्य अनटच आहे तसेच गोव्यासारखंच इथेही देशी विदेशी मद्य अतिशय स्वस्त दरात मिळते म्हणून इथं मद्याची मोठमोठी दुकाने पहायला मिळतात. अशा प्रकारच्या गोव्याची आठवण करून देणाऱ्या ठिकाणाला भेट द्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

 अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


फोटो साभार:- Google Map

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या इतर पोस्ट वाचण्यासाठी माझ्या भटकंती एक्सप्रेस या ब्लॉगला नक्की भेट द्या. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://bhatkantiexpress.blogspot.com 


https://youtu.be/eDA93zhL0NE

अलीकडेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराष्ट्र ट्रेकर्स, भटकंती एक्सप्रेस यांच्या सहकार्याने  चांदोली अभयारण्याला भेट देण्याचा योगआला होता तेव्हा सातारा जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शाळा भेट देण्याचा योग शिवराष्ट्र ट्रेकर्सचे श्री. प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली आला. ते याच ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्यासोबत बनवलेल्या व्हिडीओची ही झलक पहायला विसरू नका.
आणि भटकंती एक्सप्रेस चॅनेलला सबस्क्राईब केले नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा. 
क्रमशः
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा