शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

चांदोली अभयारण्य

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙
🥗🥗 चांदोली अभयारण्य 🥙🥙

सातारा, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यातील 300 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळावर  चांदोली अभयारण्य आहे. हे राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे. त्यामुळे या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत आहे. या राष्ट्रीय उद्यानाची प्राणिगणना २०१० साली, मे महिन्यात दोन टप्प्यांत करण्यात आली. संपूर्ण अभयारण्याची १२ खंडांत विभागणी केली आहे. प्राणिगणनेसाठी प्रत्येक खंडात एक गट याप्रमाणे प्राण्यांचे पाणस्थळ व पायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी केली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाते. त्यानुसार सर्वांचे अहवाल एकत्रित करून राष्ट्रीय उद्यान प्रशासन तात्पुरती प्राण्यांची आकडेवारी निश्‍चित करते. वाघ, बिबटे यांचे ठसे नागपूर येथील मुख्य कार्यालयात जमा केले जातात. त्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच आकडेवारी निश्‍चित केली जाते. ठशांवरूनच कोणता प्राणी (वाघ की बिबट्या) नर, मादी, पिल्लू, त्यांचे वय यांची निश्‍चिती केली जाते. तुम्ही कधी चांदोली अभयारण्यात गेला आहात का? मला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का!
चांदोली अभयारण्यात वाघ, बिबटे,भेकर, रानगवा,सांबर, रानकुत्रे, अस्वल, मोर अनेक प्रकारचे साप,घोरपड असे अनेक प्राणी आढळतात. अभयारण्यात सदाहरित, निमसदाहरित, पानझडी इत्यादी प्रकारचे वृक्ष आढळतात. ज्यात जांभूळ, बांबू,आंबा,अंजनी, हिरडा, आवळा, वेत, करवंद, कारवी यांचा समावेश आहे.
अभयारण्यात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
एकमार्ग आहे वारणा नदीवरील चांदोली धरणाजवळील वारणावती इथून आणि दुसरा मार्ग आहे कराड पाटण नवीन पुलावरून. चांदोली अभयारण्यात प्रचितगड व भैरवगड हे किल्ले आहेत. नाव, कळे, कोळणे, पाथरपुंज ही अतिशय दुर्गम गावं आहेत. या गावांमध्ये कोणत्याही मोबाईलला रेंज नसते. वाहनांची कसलीही सोय  नसते. अभयारण्य परिसर असल्याने इथं रस्तेही सगळे कच्चे आहेत. सगळा प्रवास धुळीतून करावा लागतो. पण निसर्गाच्या सानिध्यात जायचं म्हणल्यावर तर इतकं असणारच.  पाथरपुंजच्या पुढे भैरवगड आहे. शिवराष्ट्र ट्रेकर्स साताराचे ट्रेकर्स प्रदीप सावंत यांची कोळणे ही शाळा. प्रदीप सावंत आणि स्वप्नील चव्हाण यांच्यामुळंच  मला चांदोली अभयारण्य आणि भैरवगड  पहायचा योग आला. तो अनुभव खूपच सुंदर होता. ऐन पावसाळ्यात एकदा चांदोली अभयारण्यात जायची मनापासून इच्छा आहे. बघू कधी शक्य होते ते!!!!
फोटो ठिकाण:-  सातारा जिल्ह्यातील सर्वात दुर्गम शाळा जि.प.प्राथ.शाळा कोळणे.
सदरच्या पोस्टमध्ये एक सिक्रेट प्रश्न तुम्हाला विचारला आहे त्याचे उत्तर द्यायला विसरू नका बरं!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙