*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग दहा*🌿🌿
इतिहासाची पाने चाळता चाळता किती वेळ गेला आहे हे लक्षात आले नाही अचानक तंद्री भंगली आणि मी समोर पहिले तर संपूर्ण आकाशात लालिमा पसरला होता बुरुजावरून खाली पहायची छाती होत नव्हती इतकी खोल दरी होती
मी मागे फिरून किल्ल्यावर चढू लागलो दुतर्फा दुकाने, हॉटेल्स आहेत किल्ल्या वर भवानी मातेचे मंदिर आहे तुळजापूरची भवानी भोसले घराण्याचे कुलदैवत आहे शिवरायांना सतत तुळजापूरला जाणे शक्य नाही म्हणून भवानी मातेचे मंदिर इथे उभारले आहे आणि केदारेश्वराचेहि मंदिर आहे केदारेश्वर व भवानी मातेचे दर्शन घेतले आणि परत जायचे ठरवले कारण सहा वाजत आले होते आणि मला महाडपर्यंत जायचे होते अंतर आहे पोलादपूर 18 किमी महाड20 किमी.
प्रतापगडवर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत अश्वारूढ पुतळ्याजवळ सुंदर बागहि आहे पण मी मात्र परत निघालो होतो तेही परत लवकरच येण्याच्या हेतूने,
दहा पंधरा मिनिटात गड उतरलो गाडी सुरु केली अन निघालो वाटेत अफजलखानाच्या कबरीकडे जाणारा मार्गही दिसला आणि प्रवेश बंद असल्याचा फलकही गाडी न थांबवता मी निघालो 4किमी वरून पोलादपूरकडे जाणाऱ्या रस्त्याने मी गाडी चालवत होतो कसलीही घाई न करता रस्ता संपूर्ण घाटाचा आहे एकाबाजूला उंच डोंगर अन दुसऱ्याबाजूला खोल दरी अशा रस्त्याने मी चाललो होतो रस्ता अतिशय खराब आहे सात आठ किमी अंतर पार केले असता चार बुलेट सुसाट वेगाने पुढे निघून गेल्या मला वाटले फिरायला आलेले असावेत ग्रुपने मी त्यांना गाठून चौकशी केली असता कळले की ते गोव्याचे आहेत आणि ते महाबळेश्वरला आहे होते फिरायला अन आता ते परत गोव्याकडे निघाले होते त्यांनीही रस्त्याची तक्रारच केली त्यांना दूर जायचे होते आणि तेही रात्री उशिरापर्यंत त्यामुळे ते पुढे निघून गेले मी साडेसहा- पावणेसातच्या दरम्यान पोलादपूरला पोहोचलो आणि एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो त्या हॉटेलवर पोलादपूर येथे असणाऱ्या कवी परमानंद यांच्या स्मारकाची चौकशी केली पण काही त्यांना सांगता आले नाही त्यांनी शिवरायांवर शिवभारत हा ग्रंथ लिहिला आहे
मी महाडकडे प्रस्थान केले अर्धा तासाच्या आत महाडजवळ पोहोंचलो आणि एक फलक चमकला त्यावर लिहिले होते हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि हाच तो सावित्री नदीवरचा पूल जो वाहून गेला होता दोन तीन महिन्यांपूर्वी !!!
अंधारात काही दिसत नव्हते त्यामुळे न थांबता पुढे गेलो एक दोन ठिकाणी चौकशी करावी म्हणून थांबलो तर तो एक वाहतूक पोलीस होता मनात म्हटले आता आली का पंचाईत त्यांनी मात्र गाडीचा नंबर पाहून बॅगवरील नाव पाहून कोण कुठून आलात कुठे चालला अशी चौकशी केली व मला मार्गदर्शन केले की हा रस्ता बायपास अन हा रस्ता गावात जातो त्यांचे आभार मानले व महाडमध्ये मुक्कामाची चौकशी करून एका लॉजवर मुक्काम केला तेंव्हा लक्षात आले की काही वर्षांपूर्वी याच लॉजवर मुक्काम ठोकला होता कोकणात देशापेक्षा स्वस्ताई आहे हे माहित असेलच
फ्रेश होऊन मुरुड( जंजिरा? नव्हे दापोली ) येथे जाण्याचा मार्ग विचारून घेतला, महाडपासून जवळचा समुद्रकिनारा हाच आहे तोही सत्तर ऐंशी किमी अंतरावर, हे मात्र मी अचानक ठरवले मला वाटले की आलो आहोत इथे तर जसे मराठ्यांनी आपल्या घोड्याना अटकेचे (नदी) पाणी पाजले होते आणि अटकेपार झेंडे फडकावले होते तसे आपणही आपल्या गाडीचे चाक समुद्राच्या पाण्याने धुवावे कारण संपूर्ण प्रवासात गाडीइतकी साथ कुणीच दिली नाही विना अपघात विना त्रास इतकी कि प्रवासात साधी हवाही चेक करायची गरज भासली नाही.
जेवण झाल्यानंतर इंटरनेट सुरु केले व्हाट्स अँप पाहून लगेच निद्रादेवीच्या कुशीत शिरायचे ठरवले मात्र अकरा कसे वाजले हे कळलेही नाही अकरा वाजता मी निद्रादेवीच्या अधीन झालो
प्रतापगडाची माहिती विकिपीडियावरून साभार
वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजीच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.
ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत..
अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.
उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते.
अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हा(?) बुरूज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो.
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
मागील सर्व भागांच्या पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे सर्व फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा