मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

दिव, दमण, सिल्व्हासा ही नावं आपण लहानपणीच भूगोलाच्या पुस्तकात वाचली आहेत. तरी देखील ती ठिकाणं केंद्रशासित प्रदेश असल्याने त्यांच्याविषयी आपल्याला कुतूहल नेहमीच असतं. 
आज आपण दमण मधील निसर्ग सौंदर्य पाहूया. संजाण पासून दमण केवळ 24 किमी अंतरावर आहे. येताना वाटेत नारगोळचा सुंदर समुद्र किनारा आहे. परंतु दमण ला येण्याचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवेवरून वापी याठिकाणावरून दमणला जाता येते. दमण चे दोन भाग पडतात एक म्हणजे मोटी दमण आणि दुसरा नानी दमण. दमणला जामपोर समुद्र किनारा आहे. किनाऱ्यावर असलेल्या झाडीमुळे किनाऱ्याचे सौंदर्य खुलून दिसते. इथून सूर्यास्ताचे सिनेमॅटिक फोटो खूपच सुंदर निघतात म्हणून बरेच फोटोग्राफर सूर्यास्त कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी इथं येतात. मोटी दमणला एक किल्ला आहे त्याचे नाव फोर्ट ऑफ मोटी दमण असं आहे. दमणवर पोर्तुगीजांची सत्ता होती त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामावर पोर्तुगीज शैलीची छाप आढळते.
नानी दमणला देखील सेंट जोरेम फोर्ट आहे. तसेच इथला देवका हा समुद्र किनारा प्रसिद्ध आहे पण खडकाळ असल्याने पोहण्यासाठी योग्य नाही. पण अनेक चर्चेस, रेस्टॉरंट, लाईटहाऊस ही पाहण्यायोग्य ठिकाणे आहेत.
इथलं सत्यसागर उद्यान देखील सुंदर आहे. इथं गोव्यासारखं सौंदर्य बघायला मिळते पण ते गोव्यासारखं वर्दळीचा भाग बनलेला नाही तर अजूनही हे निसर्ग सौंदर्य अनटच आहे तसेच गोव्यासारखंच इथेही देशी विदेशी मद्य अतिशय स्वस्त दरात मिळते म्हणून इथं मद्याची मोठमोठी दुकाने पहायला मिळतात. अशा प्रकारच्या गोव्याची आठवण करून देणाऱ्या ठिकाणाला भेट द्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

 अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


फोटो साभार:- Google Map

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या इतर पोस्ट वाचण्यासाठी माझ्या भटकंती एक्सप्रेस या ब्लॉगला नक्की भेट द्या. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://bhatkantiexpress.blogspot.com 


https://youtu.be/eDA93zhL0NE

अलीकडेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराष्ट्र ट्रेकर्स, भटकंती एक्सप्रेस यांच्या सहकार्याने  चांदोली अभयारण्याला भेट देण्याचा योगआला होता तेव्हा सातारा जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शाळा भेट देण्याचा योग शिवराष्ट्र ट्रेकर्सचे श्री. प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली आला. ते याच ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्यासोबत बनवलेल्या व्हिडीओची ही झलक पहायला विसरू नका.
आणि भटकंती एक्सप्रेस चॅनेलला सबस्क्राईब केले नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा. 
क्रमशः
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

संजाण हे केवळ मेमोरियल पिलर ऑफ संजाण यासाठीच प्रसिद्ध आहे असे नाही तर इथली दुसरीही एक गोष्ट  खूपच प्रसिद्ध आहे पण तरीही ती आडवाटेवरची बरं का!

ती गोष्ट म्हणजे आंबा. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष, हापूस आंबा हा  आंब्याचा राजा हे सगळ्या जगाला माहिती आहे पण चालतो आंबो हे माहित आहे का?
लिहिण्यात काहीही चूक नाही, चालता आंबा the walking mango tree. संजाण मधील हा चालतो आंबा खूपच प्रसिद्ध आहे. साधारणपणे 1200 ते 1500 वर्षांचे असलेले हे आंब्याचे झाड वर्षाला एक यार्ड या वेगाने चालत आहे. गेल्या 35 - 40 वर्षांत झाड बरेच अंतर चाललं आहे असं स्थानिक सांगतात. 
 हे झाड कसं चालतं? 
तर कमानीसारख्या फांद्या असलेल्या या झाडाच्या फांद्या उंच न वाढता जमिनीलगत वाढतात व काही अंतरावर जमिनीत वडाच्या प…
[७:४५ म.पू., १७/८/२०२०] shankarsambhushinde: 🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

संजाण हे केवळ मेमोरियल पिलर ऑफ संजाण यासाठीच प्रसिद्ध आहे असे नाही तर इथली दुसरीही एक गोष्ट  खूपच प्रसिद्ध आहे पण तरीही ती आडवाटेवरची बरं का!

ती गोष्ट म्हणजे आंबा. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष, हापूस आंबा हा  आंब्याचा राजा हे सगळ्या जगाला माहिती आहे पण चालतो आंबो हे माहित आहे का?
लिहिण्यात काहीही चूक नाही, चालता आंबा the walking mango tree. संजाण मधील हा चालतो आंबा खूपच प्रसिद्ध आहे. साधारणपणे 1200 ते 1500 वर्षांचे असलेले हे आंब्याचे झाड वर्षाला एक यार्ड या वेगाने चालत आहे. गेल्या 35 - 40 वर्षांत झाड बरेच अंतर चाललं आहे असं स्थानिक सांगतात. 
 हे झाड कसं चालतं? 
तर कमानीसारख्या फांद्या असलेल्या या झाडाच्या फांद्या उंच न वाढता जमिनीलगत वाढतात व काही अंतरावर जमिनीत वडाच्या प…
[१०:५५ म.पू., १७/८/२०२०] shankarsambhushinde: 🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

दिव, दमण, सिल्व्हासा ही नावं आपण लहानपणीच भूगोलाच्या पुस्तकात वाचली आहेत. तरी देखील ती ठिकाणं केंद्रशासित प्रदेश असल्याने त्यांच्याविषयी आपल्याला कुतूहल नेहमीच असतं. 
आज आपण दमण मधील निसर्ग सौंदर्य पाहूया. संजाण पासून दमण केवळ 24 किमी अंतरावर आहे. येताना वाटेत नारगोळचा सुंदर समुद्र किनारा आहे. परंतु दमण ला येण्याचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवेवरून वापी याठिकाणावरून दमणला जाता येते. दमण चे दोन भाग पडतात एक म्हणजे मोटी दमण आणि दुसरा नानी दमण. दमणला जामपोर समुद्र किनारा आहे. किनाऱ्यावर असलेल्या झाडीमुळे किनाऱ्याचे सौंदर्य खुलून दिसते. इथून सूर्यास्ताचे सिनेमॅटिक फोटो खूपच सुंदर निघतात म्हणून बरेच फोटोग्राफर सूर्यास्त कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी इथं येतात. मोटी दमणला एक किल्ला आहे त्याचे नाव फोर्ट ऑफ मोटी दमण असं आहे. दमणवर पोर्तुगीजांची सत्ता होती त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामावर पोर्तुगीज शैलीची छाप आढळते.
नानी दमणला देखील सेंट जोरेम फोर्ट आहे. तसेच इथला देवका हा समुद्र किनारा प्रसिद्ध आहे पण खडकाळ असल्याने पोहण्यासाठी योग्य नाही. पण अनेक चर्चेस, रेस्टॉरंट, लाईटहाऊस ही पाहण्यायोग्य ठिकाणे आहेत.
इथलं सत्यसागर उद्यान देखील सुंदर आहे. इथं गोव्यासारखं सौंदर्य बघायला मिळते पण ते गोव्यासारखं वर्दळीचा भाग बनलेला नाही तर अजूनही हे निसर्ग सौंदर्य अनटच आहे तसेच गोव्यासारखंच इथेही देशी विदेशी मद्य अतिशय स्वस्त दरात मिळते म्हणून इथं मद्याची मोठमोठी दुकाने पहायला मिळतात. अशा प्रकारच्या गोव्याची आठवण करून देणाऱ्या ठिकाणाला भेट द्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

 अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


फोटो साभार:- Google Map

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या इतर पोस्ट वाचण्यासाठी माझ्या भटकंती एक्सप्रेस या ब्लॉगला नक्की भेट द्या. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://bhatkantiexpress.blogspot.com 



क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

 🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

संजाण हे केवळ मेमोरियल पिलर ऑफ संजाण यासाठीच प्रसिद्ध आहे असे नाही तर इथली दुसरीही एक गोष्ट  खूपच प्रसिद्ध आहे पण तरीही ती आडवाटेवरची बरं का!

ती गोष्ट म्हणजे आंबा. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष, हापूस आंबा हा  आंब्याचा राजा हे सगळ्या जगाला माहिती आहे पण चालतो आंबो हे माहित आहे का?
लिहिण्यात काहीही चूक नाही, चालता आंबा the walking mango tree. संजाण मधील हा चालतो आंबा खूपच प्रसिद्ध आहे. साधारणपणे 1200 ते 1500 वर्षांचे असलेले हे आंब्याचे झाड वर्षाला एक यार्ड या वेगाने चालत आहे. गेल्या 35 - 40 वर्षांत झाड बरेच अंतर चाललं आहे असं स्थानिक सांगतात. 
 हे झाड कसं चालतं? 
तर कमानीसारख्या फांद्या असलेल्या या झाडाच्या फांद्या उंच न वाढता जमिनीलगत वाढतात व काही अंतरावर जमिनीत वडाच्या पारंब्यासारख्या रुजतात. त्यानंतर आधीचे खोड वाळून कुजून जाते आणि नष्ट होते. पुढे काही वर्षांनी फांद्या पुढील बाजूस जमिनीत रुजतात असे हे चालणारे झाड सुरवातीपासून दोन तीन किलोमीटर अंतर चालले आहे.
इतकंच नाही तर हे झाड औषधी गुणधर्म असलेले आहे. लहान मुलांच्या पोटात दुखत असेल तर फांदीचा गर उगाळून दिल्यास आराम पडतो. तसेच मुकामार लागलेल्या ठिकाणी फांदी लावल्यास आराम पडतो. असे स्थानिक सांगतात. या आंब्याची चव फारसी वेगळी नाही पण हा आंबा पिकला की दोन तीन दिवसांत खराब होतो. 
गुजरात राज्यातील उच्चपदस्थ वनाधिकाऱ्यांनी या आंब्याच्या  फांद्यापासून कलमे विकसित करण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नाही. तीनशे चारशे आंब्याच्या कलमापैकी एकही कलम फुटले नाही असेही स्थानिक सांगतात. असे हे चालणारे आंब्याचे झाड चालतो आंबो बघायला हवं ना!!

 अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


फोटो साभार:- चालतो आंबो फेसबुकपेज

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या इतर पोस्ट वाचण्यासाठी माझ्या भटकंती एक्सप्रेस या ब्लॉगला नक्की भेट द्या. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://bhatkantiexpress.blogspot.com 

मित्रहो,
नमस्कार. 74 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भटकंती एक्सप्रेस परिवारांमार्फत चॅनेलची निर्मिती केली आहे.तरी भटकंती एक्सप्रेस हे you tube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.

भैरवगडावर मित्रांनी केलेला जल्लोष गो कोरोना गो
https://youtu.be/r5NzFYfqkkQ

चांदोली अभयारण्यात असलेल्या भैरवगगडाची सफर 

https://youtu.be/hFnPkc4mihs

चांदोली अभयारण्यात असलेल्या भैरवगगडाची सफर 
https://youtu.be/iMB_xIzUP7E

सोलापूर जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या सुळकाई ता. माळशिरस इथं केलेली पहिली सायकलस्वारी
https://youtu.be/cyjUmNH6fyI

व्हिडिओ आवडल्यास like, share आणि comment करायला विसरू नका.

क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं ठिकाण म्हणजे काय! हे जर अनुभवायचं असेल तर इथं यायलाच हवंय.अस्सल कोकणाचे वर्णन केलं आहे असे ठिकाण पहायचं असेल तर इथं येण्याशिवाय गत्यंतर नाही.  सगळा कोकण फिरून झालाय आता काय बघावं कोकणात! असं म्हणणाऱ्यानी  तर इथं आलंच पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली- हर्णे रोडवर  साधारणपणे सहा सात किलोमीटर अंतरावर आसूद नावाचं गाव आहे. तिथून जवळच दाबकेवाडी नावाचं पुस्तकात वर्णन केल्यासारखं गाव आहे. गावातून  पायवाटेने इथं यावं लागतं. आणि हो! आधी नाव सांगायचं राहिलंच की! केशवराज मंदिर. 

दाबके वाडीतून अगदी छोट्या पायवाटेने मंदिरापर्यंत काही पायऱ्या चढून वर जावे लागते. आकाशाशी स्पर्धा करणारी नारळाच्या आणि पोफळीच्या बागा, अत्यंत घनदाट जंगल.  त्यातच करवंदे तसेच कोकणच्या रानमेवा असलेली झाडे झुडपे. छोटी पायवाट चालून गेल्यावर चढण लागण्यापूर्वी छोट्या नदीवरील सांकव पार करून जावे लागते. पूर्वी तो सांकव लाकडाचा होता. पण आता गावकऱ्यांनी पक्का पूल तयार केला आहे. पूल पार केला की  अर्ध्या तासाच्या चढाईने आपण मंदिराच्या परिसरात पोहोचतो. इथली झाडी पाहून अमेझॉन खोऱ्यातील दाट जंगलाची आठवण झाली नाही तरच नवल. 
मंदिराच्या समोर थोडे मोकळं पटांगण आहे. मंदिर अत्यंत साध्या पद्धतीचे आहे. लाकडी खण किंवा माळवद असलेले छप्पर आहे. मंदिर परिसर तसा मोठा आहे. त्याच परिसरात उंच डोंगरावर उगम पावणाऱ्या झऱ्याचे पाणी दगडी नळ्याच्या साह्याने मंदिराच्या समोरच गोमुख बांधून आणलेले आहे. त्या गोमुखातून वर्षभर पाणी वाहत असते. त्यातील पाण्याची चव अगदी अमृतासमान आहे. त्या पाण्याने हात पाय धुवून चेहऱ्यावर पाणी मारलं की सगळा शीण कुठल्या कुठे पळून जातो. 
मग मंदिरातील केशवराजचे दर्शन घेतले की मन एकदम प्रसन्न होऊन जाते. मंदिरात येण्यासाठी दुसरा एक मोटारसायकल जाण्याइतकाच मार्ग आहे. आणि ती अत्यंत अवघड आहे आणि दूरचा मार्ग आहे. त्या मार्गाने केवळ मोटारसायकल जाऊ शकते पण पायऱ्या चढून गेल्यानेच मंदिरात गेल्याचा आनंद मिळतो. सभोवताली निरव शांतता, आणि ती शांतता भंग करण्याचा लटका प्रयत्न करत असलेले गोमुखातून वाहणारे पाणी, घनदाट जंगल,  आकाशात घुसलेल्या झाडांच्या फांद्यामुळे सुर्यप्रकाश देखील जमिनीवर पडायची पंचाईत. या ठिकाणी आल्यानंतर इथून पाय निघतच नाही. अनेक ब्राह्मण मंडळींचे हे कुलदैवत असल्याचे सांगितले जाते. विष्णूचा अवतार असलेले हे नितांतसुंदर केशवराज मंदिर आवर्जून पहायलाच हवं.


 अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


फोटो ठिकाण:- केशवराज मंदिर

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

चांदोली अभयारण्य

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙
🥗🥗 चांदोली अभयारण्य 🥙🥙

सातारा, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यातील 300 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळावर  चांदोली अभयारण्य आहे. हे राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे. त्यामुळे या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत आहे. या राष्ट्रीय उद्यानाची प्राणिगणना २०१० साली, मे महिन्यात दोन टप्प्यांत करण्यात आली. संपूर्ण अभयारण्याची १२ खंडांत विभागणी केली आहे. प्राणिगणनेसाठी प्रत्येक खंडात एक गट याप्रमाणे प्राण्यांचे पाणस्थळ व पायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी केली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाते. त्यानुसार सर्वांचे अहवाल एकत्रित करून राष्ट्रीय उद्यान प्रशासन तात्पुरती प्राण्यांची आकडेवारी निश्‍चित करते. वाघ, बिबटे यांचे ठसे नागपूर येथील मुख्य कार्यालयात जमा केले जातात. त्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच आकडेवारी निश्‍चित केली जाते. ठशांवरूनच कोणता प्राणी (वाघ की बिबट्या) नर, मादी, पिल्लू, त्यांचे वय यांची निश्‍चिती केली जाते. तुम्ही कधी चांदोली अभयारण्यात गेला आहात का? मला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का!
चांदोली अभयारण्यात वाघ, बिबटे,भेकर, रानगवा,सांबर, रानकुत्रे, अस्वल, मोर अनेक प्रकारचे साप,घोरपड असे अनेक प्राणी आढळतात. अभयारण्यात सदाहरित, निमसदाहरित, पानझडी इत्यादी प्रकारचे वृक्ष आढळतात. ज्यात जांभूळ, बांबू,आंबा,अंजनी, हिरडा, आवळा, वेत, करवंद, कारवी यांचा समावेश आहे.
अभयारण्यात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
एकमार्ग आहे वारणा नदीवरील चांदोली धरणाजवळील वारणावती इथून आणि दुसरा मार्ग आहे कराड पाटण नवीन पुलावरून. चांदोली अभयारण्यात प्रचितगड व भैरवगड हे किल्ले आहेत. नाव, कळे, कोळणे, पाथरपुंज ही अतिशय दुर्गम गावं आहेत. या गावांमध्ये कोणत्याही मोबाईलला रेंज नसते. वाहनांची कसलीही सोय  नसते. अभयारण्य परिसर असल्याने इथं रस्तेही सगळे कच्चे आहेत. सगळा प्रवास धुळीतून करावा लागतो. पण निसर्गाच्या सानिध्यात जायचं म्हणल्यावर तर इतकं असणारच.  पाथरपुंजच्या पुढे भैरवगड आहे. शिवराष्ट्र ट्रेकर्स साताराचे ट्रेकर्स प्रदीप सावंत यांची कोळणे ही शाळा. प्रदीप सावंत आणि स्वप्नील चव्हाण यांच्यामुळंच  मला चांदोली अभयारण्य आणि भैरवगड  पहायचा योग आला. तो अनुभव खूपच सुंदर होता. ऐन पावसाळ्यात एकदा चांदोली अभयारण्यात जायची मनापासून इच्छा आहे. बघू कधी शक्य होते ते!!!!
फोटो ठिकाण:-  सातारा जिल्ह्यातील सर्वात दुर्गम शाळा जि.प.प्राथ.शाळा कोळणे.
सदरच्या पोस्टमध्ये एक सिक्रेट प्रश्न तुम्हाला विचारला आहे त्याचे उत्तर द्यायला विसरू नका बरं!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

21

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस चौथा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग एकवीस*🌿🌿
                    चार दिवसांच्या प्रवासानंतर वैरागजवळ आलो असता संपूर्ण वैराग मध्ये आतिषबाजी सुरु होती फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते रात्रीच्या आकाशात होणाऱ्या या आतिषबाजीने सारे आकाश उजळून निघाले होते जणू माझ्या आगमनाचे स्वागत करण्यात येत होते दिवाळीचा सण साजरा करण्यात येत होता परंतु माझे कशाकडेही लक्ष नव्हते घराची ओढ लागली होती अखेर चार दिवसातील 1055 किमीच्या प्रवासानंतर सायंकाळच्या साडे सात वाजता घरी आलो गाडीवरून उतरताना मन भरून आले होते आणि उगीचच महाभारताच्या लढाईची आठवण झाली मी गाडीचे आभार मानले अगदी मनापासून ती निर्जीव अन यंत्र असली तरी कारण एखाद्या जिवलग मित्राप्रमाने जशी गेली दोन वर्षे साथ दिली तशीच साथ गेल्या चार दिवसांत दिली होती कसलाही त्रास न देता, अगदी हवाही चेक करण्याची गरज लागली नव्हती, घरात आल्यावर सौ ने औक्षण केले आणि मला मी एखाद्या लढाईवरून आल्यासारखे वाटलं, घरी आल्यावर पहिले काम मी जर कोणते केले असेल तर फ्रेश होऊन एक msg तयार करून whats app वर पोस्ट केला कारण मला माहित आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची कमी नाही  पण निलेश शिंदेला माझ्या लक्षात असूनही फोन केला नाही परत करू, परत करू असे करता करता  राहून गेले आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजता परत निलेशचा फोन आला आणि माझीच मला लाज वाटली कारण माझा फोन आला नाही म्हणून त्याने फोन केला होता अशा जिवलग मित्रांचे आभार मानले तर मैत्रीचा उपमर्द ठरेल म्हणून मी त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करतो
               प्रवास संपल्यावर कंटाळा येतो पण मला असे वाटलेच नाही उलट मला उत्साह मिळाला आनंद झाला कधीकधी प्रवासाच्या  मानसिक अवस्थेचा जर विचार केला तर प्रवास हाच त्रास दायक ठरतो तोच नकोसा वाटतो माहेरवाशिणीला माहेरहून निघताना गहिवरून येते आणि संपूर्ण प्रवासात गहिवर राहतो पण सासरी आल्यावर मात्र ती परत त्या घराशी एकरूप होऊन जाते अशी अवस्था मी अनुभवली आहे कैकवेळा  जेंव्हा मी नवीन नोकरीला लागलो होतो तेव्हा हिंगोलीहून येताना कधी गावाकडे पोहोचतो असे व्हायचे पण गावाकडून जाताना मात्र माहेरवाशिणीसारखे व्हायचे संपूर्ण प्रवास जीवावर यायचा, नकोसा वाटायचा  पण एकदा तिथे गेल्यावर मात्र परत येईपर्यंत गावाकडची आठवण व्हायची नाही 
                    प्रवासवर्णन  करत असताना काही ठिकाणी वेळ व  अंतर  लिहिलेले असून ते फक्त आपल्या माहिती साठी असून अंदाजे आहे मी जो प्रवास चार दिवसात केला आहे तो खरं तर कमीत कमी 8 दिवसांचा नक्की आहे मी फार गडबडीत पूर्ण केला याची मला जाणीव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोबतीला कुणीतरी हवेच आपले हक्काचे माणूस नाहीतर जो आनंद आपण एकटेच अनुभवतो  तो असुरीच ठरेल, नाही का?
                   पाटेश्वराच्या डोंगरावरून जड अंतःकरणाने उतरताना झालेली घालमेल अन सज्जनगडावरून उतरताना आलेले वैराग्य कसे विसरणार, लिंगमळा धबधबा पहायला जातांना चार माकडांना पाहून मनात वाटलेली भीती वेण्णा नदीचे खोरे क्षितिजापर्यंत पाहताना छाती दडपून जाते की काय या विचाराने पाणी पाणी झालेले मन इको पॉइंटवर असताना झालेली एकटेपणाची जाणीव काळभैरव मंदिरात जाताना आलेली चीड प्रतापगडावरून जावळीचे खोरे पाहताना भरून आलेली छाती, पालगडला सानेगुरुजींच्या आठवणीने कासावीस झालेले मन , मुरुडचा समुद्र किनारा पाहून एक जिवलग मित्र भेटल्याची भावना, रायगडावर तुमचं आमचं नातं काय ? या जयघोषानंतर अंगावर आलेले रोमांच, पहाटेच्या गडवाऱ्यात आणि रायगडावरील सूर्योदय पाहताना परत कधी असा योग्य येईल या विचाराने कातर झालेले मन, असे  एक ना अनेक प्रसंग मनात घर करून बसले आहेत आणि त्या वरही पुरून उरला तो म्हणजे एकट्यानं एवढा प्रवास करण्याचा बेधुंद अनुभव, खरंच एकट्यानं प्रवास करण्यातही एक मजा आहे एक धुंदी आहे एक मस्ती आहे एक आनंद आहे तो अनुभवण्यासाठी आपणही कधीतरी एकट्याने प्रवास करावाच यापुढंही असा प्रवास करायला खूपच आवडेल नक्कीच पण कधी योग येईल काय माहित? असा योग आल्यास नक्की प्रवास करणारच आपल्यापैकी जर कोणाला करायची आवड असल्यास आपणही प्रवास करावा हि विनंती आणि तो प्रवास माझ्याबरोबर असेल तर सोने पे सुहागाच!
                      आज माझ्या *बाईकसवारी:-एक प्रवास* या प्रवास वर्णन लेखनाचा शेवटचा भाग आहे लेखनसमाप्ती करताना अतिव दुःख होतं आहे मन भरून आलं आहे एखादी सुंदर कलाकृती पूर्ण केल्यावर कलाकाराला जो अनुभव येत असेल तोच अनुभव मी घेत आहे, तो आनंद आणि ते मानसिक समाधानही मी यावेळी अनुभवतो आहे सुखदुःखाच्या ऊनपावसाचा अनुभव मला आता येतोय अन मला कृतार्थ झाल्यासारखे वाटत आहे प्रवास वर्णन  लेखन करणे हा हेतू नव्हताच मुळी पण लक्ष्मण वाघमारे गुरुजीसारख्या जेष्ठ मित्रांच्या आग्रहामुळे हा अक्षरयज्ञ मी आरंभिला, प्रत्येक शब्दाची समिधा या यज्ञात अर्पण करताना मन भरून येत आहे पण त्याच बरोबर परत एकदा वाचकांच्यासह  सहल केल्याचा आनंद अनुभवायला मिळाला याबद्दल माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांचे त्रिवार आभार व्यक्त करण्यापेक्षा ऋणात राहणेच मी पसंत करीन. 
                आज लेखन करताना हात अन हृदय दोन्ही जड झालेलं आहे शब्द सुचत नाहीत  यावेळी ज्यांच्या आठवणीने माझे डोळे भरून  आले आहेत ते माझे परममित्र मार्गदर्शक अन निखळ मनाचा माणूस शिवशंकर  साखरे गुरुजी, संपूर्ण प्रवासात माझी फोन करून विचारणा करणारा आदिल सय्यद सर , राजेंद्र आवारे गुरुजी अध्यक्ष शिक्षक संघ वैराग,आनंद पिंपळे सर (करमाळा), दीपक शेळके,  गु.ना कल्याणी, (ज्याचे हेल्मेट घेऊन मी हा प्रवास पूर्ण केला )बा रा पाटील गुरुजी  सतिश ढेकळे गुरूजी महावीर तुपसमिंदर सर (सातारा) भोसले सर (सातारा)महाबळेश्वरचा प्रवास ज्यांच्यामुळे कमी वेळात पूर्ण झाला ते चव्हाण सर (सातारा) , विनायक शिंदे सर ( महाड ) निलेश शिंदे (रहाता) तसेच सर्व मित्र हितचिंतक वाचकांचे व  प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मित्रांचे ऋण डोक्यावर घेऊन नाचताना आनंद होतो आहे
               माझ्या लेखनाचे कौतुक करणारे बब्रूवाहन काशीद गुरुजी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक संघ शाखा सोलापूर ,आमची प्रत्यक्ष ओळख नसतानाही संपूर्ण प्रवासात माझी विचारपूस करणारे तसेच माझ्या प्रत्येक भागाच्या  लेखनाचे कौतुक करणारे शिक्षक नेते जोतिराम बोंगे गुरुजी (पंढरपूर) तुमची कौतुकाची थाप माझे मनोबल वाढविणारी ठरते प्रत्येक वेळी!
                   प्रवास वर्णनाचे लेखन करतेवेळी माझ्या लेखनाला इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही नव्हती. सोशल मीडियावर दररोज अंदाजे 12 ते 13 हजार मित्रांपर्यंत माझे लेखन पोहोचत आहे, या प्रवास वर्णनाच्या लेखनाने मला काय मिळालं तर अनेक मित्र केवळ या लेखनाच्या माध्यमातून मिळाले शेकडो मित्रांनी माझ्या लेखनाचे समक्ष, सोशल मीडियावर, फोन करून कौतुक केलं, अनेकांनी प्रवास समक्ष अनुभवत असल्याचे सांगितले याहीपेक्षा मला मिळालेलं आत्मिक समाधान खूप मोठं आहे परत एकदा माझ्यावर प्रेम करणाऱ्या , मला लेखन करायला लावणाऱ्या , माझं लेखन वाचणाऱ्या, माझं कौतुक करणाऱ्या  आणि प्रत्यक्ष प्रवास करताना मला मदत करणाऱ्या ज्ञात-अज्ञात मित्रांचे ऋण व्यक्त करतो 
           जीवनाच्या मागे धावपळ करत असताना वेळ मिळाला तर असा प्रवास करायला नक्कीच आवडेल या लेखमालेचे वाचन करणारा एखादा वाचक जर पुढच्या प्रवासात सोबती मिळाला तर यापेक्षा आनंद तो दुसरा कोणता असेल? पाणावलेल्या पापण्यांच्या कडा आणि भरून आलेलं मन यासह तात्पुरता आपला निरोप घेऊन लेखनाची सांगता करतो 
नमस्कार!!!!!🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
     परत भेटू लवकरच नव्या प्रवास वर्णना सह
*ता क*:-ज्या वाचक मित्रानी पहिल्या भागापासून वाचन केले नाही त्या वाचकांना तर माझा प्रवास सुरू आहे असे वाटते असे बरेच संदेश, फोन मला आले  या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो की सदरचा प्रवास मी 27 ते 30 ऑक्टो.2016 या काळात केलेला आहे. प्रवास करताना माझे लेखन उपयुक्त ठरले तरच या लेखनाचे यश आहे माझ्या *बाईकसवारी:-एक प्रवास* या लेखमालेच्या मागच्या सर्व भागांचे pdf रूपांतर केले आहे ते download करण्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून download करून घ्यावे
https://goo.gl/n8ncCL

लेखनसीमा
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
मागील सर्व भागांचे pdf download करण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/n8ncCL
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये