🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙
संजाण हे केवळ मेमोरियल पिलर ऑफ संजाण यासाठीच प्रसिद्ध आहे असे नाही तर इथली दुसरीही एक गोष्ट खूपच प्रसिद्ध आहे पण तरीही ती आडवाटेवरची बरं का!
ती गोष्ट म्हणजे आंबा. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष, हापूस आंबा हा आंब्याचा राजा हे सगळ्या जगाला माहिती आहे पण चालतो आंबो हे माहित आहे का?
लिहिण्यात काहीही चूक नाही, चालता आंबा the walking mango tree. संजाण मधील हा चालतो आंबा खूपच प्रसिद्ध आहे. साधारणपणे 1200 ते 1500 वर्षांचे असलेले हे आंब्याचे झाड वर्षाला एक यार्ड या वेगाने चालत आहे. गेल्या 35 - 40 वर्षांत झाड बरेच अंतर चाललं आहे असं स्थानिक सांगतात.
हे झाड कसं चालतं?
तर कमानीसारख्या फांद्या असलेल्या या झाडाच्या फांद्या उंच न वाढता जमिनीलगत वाढतात व काही अंतरावर जमिनीत वडाच्या पारंब्यासारख्या रुजतात. त्यानंतर आधीचे खोड वाळून कुजून जाते आणि नष्ट होते. पुढे काही वर्षांनी फांद्या पुढील बाजूस जमिनीत रुजतात असे हे चालणारे झाड सुरवातीपासून दोन तीन किलोमीटर अंतर चालले आहे.
इतकंच नाही तर हे झाड औषधी गुणधर्म असलेले आहे. लहान मुलांच्या पोटात दुखत असेल तर फांदीचा गर उगाळून दिल्यास आराम पडतो. तसेच मुकामार लागलेल्या ठिकाणी फांदी लावल्यास आराम पडतो. असे स्थानिक सांगतात. या आंब्याची चव फारसी वेगळी नाही पण हा आंबा पिकला की दोन तीन दिवसांत खराब होतो.
गुजरात राज्यातील उच्चपदस्थ वनाधिकाऱ्यांनी या आंब्याच्या फांद्यापासून कलमे विकसित करण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नाही. तीनशे चारशे आंब्याच्या कलमापैकी एकही कलम फुटले नाही असेही स्थानिक सांगतात. असे हे चालणारे आंब्याचे झाड चालतो आंबो बघायला हवं ना!!
अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
फोटो साभार:- चालतो आंबो फेसबुकपेज
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या इतर पोस्ट वाचण्यासाठी माझ्या भटकंती एक्सप्रेस या ब्लॉगला नक्की भेट द्या. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://bhatkantiexpress.blogspot.com
मित्रहो,
नमस्कार. 74 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भटकंती एक्सप्रेस परिवारांमार्फत चॅनेलची निर्मिती केली आहे.तरी भटकंती एक्सप्रेस हे you tube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
भैरवगडावर मित्रांनी केलेला जल्लोष गो कोरोना गो
https://youtu.be/r5NzFYfqkkQ
चांदोली अभयारण्यात असलेल्या भैरवगगडाची सफर
https://youtu.be/hFnPkc4mihs
चांदोली अभयारण्यात असलेल्या भैरवगगडाची सफर
https://youtu.be/iMB_xIzUP7E
सोलापूर जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या सुळकाई ता. माळशिरस इथं केलेली पहिली सायकलस्वारी
https://youtu.be/cyjUmNH6fyI
व्हिडिओ आवडल्यास like, share आणि comment करायला विसरू नका.
क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा