*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग सहा*🌿🌿
वेण्णा तलावापासून बाजारपेठेजवळून तापोळ्याला जाणाऱ्या रस्त्याने मी जात होतो तापोळेला जाताना मिनी काश्मीर असे बरेच फलक दिसले तापोळे बामणोली या ठिकाणी कोयना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जलक्रीडेच्या अनेक बोटी आहेत आपल्याला अनेक ठिकाणी तेथून जाता येते वासोटा किल्लाही पाहता येतो
महाबळेश्वर ते तापोळे 27 किमी अंतर आहे तापोळे या ठिकाणी जाऊन परत येणे असे ठरवले होते मिलिंद गुणाजी यांच्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे एका बाजूने कोयना व एका बाजूने सोळशी या दोन नद्या वाहतात आणि मध्ये असणाऱ्या डोंगर रांगेवरून रस्ता आहे घनदाट झाडी इतकी आहे की संपुर्ण रस्त्यावर सावलीच असते तापोळेला पोहोचण्यापेक्षा रस्त्याचा प्रवासच अतिशय रमणीय आहे पण प्रत्यक्ष मात्र असे आढळले नाही आणि रस्ता अतिशय खराब असल्याने तापोळे येथे जायचे मी रद्द करून त्या मार्गावर साधारणपणे 16 किमी अंतरावर असलेल्या शिवसागर पॉईंट या ठिकाणी जाऊन आलो आहे या पॉइंटवरून कोयना धरणाचा जलाशय म्हणजेच शिवसागराचे विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न होते सह्याद्रीच्या विविध डोंगरांच्या कुशीत फाट्या फाट्याने शिरलेले पाणी पाहून आपण महाबळेश्वर किंवा महाराष्ट्रामध्ये आहोत असे वाटतच नाहीतर आपण अगदी परदेशातील एखादया निसर्गरम्य ठिकाणी आहोत किंवा हॉलिवूड मधील दृश्य पहातो आहोत असा भास होतो अतिशय सुंदर व मन प्रसन्न करणारे दृश्य आहे आणि ते पाहून मन हरखून जाते तिथून पाय निघता निघत नाही
वेळ कसा गेला आणि किती वेळ गेला हे कळतही नाही महाबळेश्वरच्या मानाने थोड्या उघड्या माळावर हा पॉईंट आहे इथे हॉटेलचीही बरीच उणीव जाणवते येथून तापोळे 10 ते 12 किमी अंतरावर आहे अतिशय सुरेख दिसणारे निसर्गाचे रूप पाहून मी परत फिरलो या मार्गावर रस्ता सोडला तर बाकी सर्व एकदम मस्त आहे सुंदर आहे महाबळेश्वरमधील एक गोष्ट म्हणजे कोणत्याही पॉइंटवर जायचे असेल तर परत मार्केटजवळच यावे लागते त्यामुळे मी परत फिरलो त्या मार्गावर साधारण 10 किमीवर एक पॉईंट आहे नाव त्याचे नाव माझ्या लक्षात नाही बहुतेक शिवकालीन पॉईंट असे काहीतरी असावे या ठिकानाहूनही अत्यन्त चांगले दृश्य पहायला मिळते येथे रस्त्यालगतच एक छोटा धबधबा आहे आणि एकच टपरीवजा हॉटेल, मी येथे थांबलो असता एकदोन वाहनचालकांनी शिवसागर पॉईंट कुठे आहे? अशा प्रकारचे प्रश्न विचारले असता हॉटेल मालकीण असणाऱ्या आजीने मी अशी माहिती सांगण्यावर नाराजी व्यक्त केली आणि कारण तिच्यामते गाडी थांबवून तिला विचारले म्हणजे ती हाच शिवसागर पॉईंट आहे असे सांगेल आणि तिची काही खरेदी केली जाईल पण मी मात्र तिचं गिऱ्हाईक तोडत होतो असे तिला वाटत होतं असो, मी थोडावेळ थांबून पुढे निघालो महाबळेश्वरचीच नाही तर कोणत्याही ठिकाणची प्रवासाची मजा घ्यायची असेल तर बाईकवरच जायला हवे मी परत बाजारपेठेजवळ आलो आणि विल्सन पॉइंटची चौकशी केली
महाबळेश्वरमधील बाजार पेठेपासून सर्वात जवळचा व महाबळेश्वरमधील उंचावरचा पॉईंट म्हणजे विल्सन पॉईंट होय. महाबळेश्वरमधील सर्व पॉइंटची, रस्त्याची नावे इंग्रज अधिकारी, माणसं यांच्या नावावरूनच असलेली आपल्याला आढळतात 2 किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाणारा रस्ता एकेरी असून दुतर्फा घनदाट झाडी आहे त्यामुळे जातानाच खूप मजा येते अतिशय घनदाट जंगल आहे अक्षरश: सूर्यकिरणेही जमिनीवर पोहोचत नाहीत उंचीवर गेले की मात्र खूप मोठे मैदान दिसते तसेच पोलीस चौकीही असावी खूप मोठे मैदान असून या मैदानाच्या कडेवर दोन उंच चबूतरे बांधले आहेत आपण त्या ठिकाणी बसून क्षितिजापर्यंत दिसणारा सुंदर निसर्ग आपण न्याहाळू शकतो वातावरणही शांत आहे कसलाही गोंगाट नाही कलकलाट नाही फक्त शांतता ! वेळ कसा जातो हे कळतही नाही सूर्य डोक्यावर आला तरी गुलाबी थंडी हीच खरी इथली खासियत आहे येथे घोड्याची रपेटही आपण करू शकतो एकदोन घोडेही इथे दिसले हिरव्यागार डोंगरावरून दूरवरचा परिसर दिसतो त्या ठिकानाहून हलूही वाटत नाही वेळ कसा जातो ते समजतही नाही मी तर तहानभूक विसरून जातो अशावेळी!तिथून परत निघावे वाटत नव्हते मात्र इथेच जास्त वेळ घालवून जमणार नव्हत म्हणून मी परत निघालो विल्सन पॉईंट वरून खाली उतरून येताना दुसऱ्याच मार्गाने आलो होतो या ठिकाणीही असाच एकेरी रस्ता व घनदाट झाडी त्यामुळे मजा अनुभवायला मिळत होती जाताना वाटेत चढ होता पण येताना मात्र उतार होता अरुंद रस्ता तीव्र उतार हेच या रस्त्याचे वैशिष्ट्य आहे आणि रहादरीही खूप कमी आहे मी बाजारपेठेजवळ आलो आणि चौकशी केली ओल्ड महाबळेेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याची आणि पुढे निघालो बाजारपेठेपासून ओल्ड महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याने मी निघालो होतो याच रस्त्यावर मधमाशीपालन केंद्र आहे त्याठिकाणी अस्सल मध गोळा करून विकला जातो येथे मी थांबलो नाही त्यामुळे मला जास्त माहिती सांगता येणार नाही तसेच प्रत्येक पॉइंटवर शेंगा,फुटाणे स्ट्रॉबेरी, लांबलचक गाजरे, जेली चॉकलेट कंदमुळे सॉस यांची रेलचेल असते महाबळेश्वरपासून ओल्ड महाबळेश्वर थोडे दूर आहे जाताना वाटेत एक पॉईंट लागतो तो म्हणजे केट्स पॉईंट रस्त्यापासून 4 किमी अंतरावर आहे याचे परंतु मी मात्र महाबळेश्वराच्या मंदिराकडे निघालो होतो कारण 1 वाजला होता आणि मला अजून बराच लांबचा टप्पा पार करायचा होता मंदिराच्या अलीकडे थोड्याच अंतरावर सावित्री पॉइंटकडे अशी पाटी दिसली
पार्कींग मध्ये गाडी पार्क करून महाबळेश्वराच्या मंदिराच्या आवारात प्रवेश केला गर्दी खूप कमी होती कारण सणाचे दिवस होते गर्दी अगदी नाच्या बरोबर होती येथे खूप मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत आणि सगळीकडे एकाच मालाची विक्री केली जाते मध जेली कातडी वस्तू अशा दोन्ही बाजूंनी दुकाने असणाऱ्या रस्त्याने मी हजारो वर्षे पूर्ण केलेल्या महाबळेश्वरच्या मंदिरात जाऊन शांत वाटत होतं मनातल्या मनात ओम नमः शिवाय चा जप सुरु होता अंधाऱ्या गाभाऱ्यात शिरून शिवलिंगाचे दर्शन घेतले नंदादीपाच्या मंद प्रकाशात शिवलिंग तेजस्वी भासत होते मंदिराबाहेर मंदिराचा जीर्णोद्धार कधी , कुणी , केंव्हा केला आहे याची माहिती मिळाली पण मला मात्र मनात एकच घटना आठवत होती तुम्हांलाही आठ्वलीच असेल…… अगदी बरोबर!!
छत्रपती शिवरायांनी याच मंदिरात माँसाहेब जिजाऊ साहेब यांची सुवर्ण तुला केली होती येणारी हजारो वर्षे लोटली तरी महाबळेश्वर मंदिरातील मातीचा कण अन कण ती घटना विसरू शकणार नाही अन महाराष्ट्राची मातीही!
क्रमश:
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
मागील सर्व भागांच्या पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे सर्व फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा